आजकाल ब-याच पेपर्स मध्ये शैक्षणीक पुरवण्या दिल्या जातात. त्यामध्ये करीअर गाईड करणा-या मोफत व्याख्यानांची पैसे देउन जाहिरात केली जाते. कॉलेजमध्ये कुठेतरी वेळ काढावाम्हणून आणि जरा चांगलं इंग्लीश कानावर पडावं म्हणून आम्ही दोघा तिघांनी हे फुकट सेमिनार अटेंड करायचं असं ठरवलं.
त्याचं झालं अस की या आधी माझ्या एका मित्रानी या आधी एक सेमीनार अटेंड केलं होतं. त्याचा अनुभव चांगला होता. संध्याकाळी साधारण ५ ते ६ च्या दरम्यान हे सेमीनार आयोजीत केलं जातं. या सेमीनार मध्ये एक नोट पँड, चांगलसं पेन आणि अमुक-तमुक कॉर्सेस चे बुकलेट,ब्राउशर, पँप्लेट्स फ्री(तेवढीच रद्दीत भऱ) . महत्वाचे म्हणजे चहा,कॉफी अल्पउपहार पण असतो. आद्यावत माहीती मिळते तो भाग ज्ञानाचा झाला. आपण मजा करायला चाललो आहोत. म्हणजे मजे मजेत घेतलेलं ज्ञान चांगलं लक्षात राहतं.
हां तर मी मी पाहीलेल्या सेमीनार बद्दल सांगत होतो.तर आम्ही तिघे जण सेमीनारला गेलो. अध्यक्षांच्या भाषणा आधी सुत्रसंचालकाने आमचं स्वागत केलं. त्यानंतर सुत्रसंचालकानी त्यांच्या चिवडा- वेफर असोशीएशन च्या अध्यक्ष, प्रमुख पाहूणे आणि व्याख्याते यांना दिवा-बत्ती ,अगरबत्ती, सरस्वती पुजन करायला सांगीतली. हे सगळं झाल्यावर अध्यक्षांनी थोडसं (म्हणजे तब्बल २० मिनीटे) भाषण केलं त्यानंतर मान्यावरांच्या हस्ते अमुक-तमुक परिक्षेत टॉप केलेल्या किर्तिवंतं,बुध्दीवंत आणि संस्थेच्या निष्ठावान लोकांचा सत्कार केला. आमच्यासारखे मतीमंद, गतीमंद खाली बसून टाळ्या वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवत होते.
त्यानंतर झाला चहाचा ब्रेक,चहा, चिवडा आणि कचोरी संपवून माझामित्र निघायच्या तयारीत होता. मी म्हटलं ते संस्थेचे कार्यकर्ते तुझा हेतू ओळखतील. आता खल्लया कचोरीला आणि ढोसल्या चहाला जग. काय असतील ते तास दोन तास इथे ढेकर देत बस. मग तो जरा खजील होउन बसला. मध्यांनानंतर निवेदकानी एका-एका व्याख्यात्यांची ओळख करुन दिली. त्यांचा बायोडेटा सांगताना आमच्या लक्षात आले की एकही व्याख्याता पीएचडीच्या खाली नाही. आमच्या कॉलेज चे प्रिंसिपल सोडले तर कोणताच पीचडी धारक आम्ही बघीतला नव्हता.
त्यात बरेचसे आम्हाला आय स्पेशलीस्ट वाटत होते. आमच्या भाषेच आय स्पेशलीस्ट म्हणजे मी-मी म्हणवणारे . अगदी साध्या भाषेत सांगायचंतर स्वत:ला शाहाणे समजणारे. त्यांच्या भाषणात त्यानी जगातली वाढती महागाई, बेरोजगारी, स्पर्धा इ.इ ची स्टँटँस्टीकल आकडेवरी सांगून जमलेल्या मुलांना आणि पालकांना घाबरवून सोडलं. मग पुढे आमच्या अमुक-अमुक संस्थेतून इतके लाख भरुन तुम्ही आमचा xyz कोर्स करा.आमच्याकडे कँपस इंटरव्ह्यू साठी जगात ल्या इतक्या- इतक्या इंडस्ट्रीज येतात. आणि आजच्या भयानक वास्तवातून तुम्ही थेट युरोप-अमेरिकेत एक्सपर्ट म्हणून (इंपोर्टेड माला प्रमाणे) एक्सपोर्ट होता. तुम्हाला एक्सपोर्ट करायची जबाबदारी आमची म्हणजे सस्थेची. वगैरे-वगैरे.
तसंच तुम्हा इच्छुक असाल तर तुमचं रजीस्ट्रशन फ्रि करुन आम्ही तुम्हाला आमच्या कोर्सपासून ते तुमच्या फॉरेनटूर पर्यंत सगळं व्यवस्थापन करण्यासाठी इथे “ ऐसीवैसी बँक” आपव्या सेवेस हजर आहे.पुढे कायझालं कि आमच्याकडुन भरुन घेतलेले फॉर्म आणि त्यावर असणारी आमची डिटेल यांचा संस्थेच्या लोकांनी कसून पाठपुरावा केला. सारखे घरी फोन करून आमचा कोर्स कसा चांगला आहे. हे आमच्या सुजाण आणि सुज्ञान पालकांना पटवून देण्याचा प्रयत्यन केला. त्याचा परीणाम असा झाला की ...“ आधीच्या चार केट्या सोडवा गप्प डिग्रीघ्या मग करा काय करायचेत ते कोर्स, आणि बाहेर गावी जाउन काय नोक-या करणार इथे जेवलेलं ताट धुता येत नाही तर.... ” म्हटलं आधीच हाऊस त्यात पडला पाऊस !
रत्नाकर पवार,
9820501363
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें