आमचं के.सी.कॉलेज म्हणजे....
स्थळ आमचा मराठी जर्नालीझमचा (म्हणजे मरीठी
पत्रकारीतेचा )वर्ग. सगळे विशी-पंचविशीतले तरुण-तरुणी.(काही अपवाद वगळता) पत्रकार म्हणजे
प्रश्न विचारायची मुभा असलेला माणुस. सचीन सरांच्या भाषेत सांगायचं तर मोकाट
माणुस. बरं वर्गामधे नव्याने दाखल झालो होतो. पहीलं लेक्चर पराग पाटील सरांचं उर्फ
पपांच होतं. पत्रकरितेत
अँडमिशन का घेतलं ?सर सगळ्यांना विचारत होते.
कुणी म्हणत होत देश सुधारण्यासाठी , कुणी
भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी, कुणी आणखीन काय. माझा नंबर आला मी म्हटलं “ मला जे माहीत आहे ते इतरांना सांगायला आवडतं.
त्यासाठी पत्रकार व्हयचं आहे.’’मी पुढे येणारी केसं सावरत म्हटलं. सरांनी मला पहिल्याच दिवशी
झुल्फीकार अशी उपमा दिली.मला पाकीस्तानचे झुल्फीकार अली भुत्तो आठवले. आमच्या वर्ग
भगीनींनी काही दिवसांनी मला झुल्फीकार म्हणून संबोधण्यास सुरवात केली.
पुढे लेक्चर होत असताना मी सवयीच्या (दुर्गुणांनी)गुणांनी
सरांना मधेच प्रश्न विचारायचो. सर (कधी-कधी) उत्सफुर्तपणे उत्तरं द्यायचे. माझ्या
इतर मित्र-मैत्रीणींना (आत्तापर्यंत एक दोन झाले होते.)त्यांना त्रास व्हायचा.
त्यांची ट्रेनमिस होण्याची दाट शक्यता असायची. कालांतराने हे माझ्यालक्षात आले. पण
हे लक्षात येण्या आगोदर भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती आणि महीला मंडळ यांचा प्रेमळ
सल्ला असायचा.” तु जरा शांत बसत जा.”कधी कधी नुस्ता दृष्टीक्षेपातुन तर कधी
थेट लेक्चर चालु असताना. आमने- सामने !
त्यआधी मी त्यांना विचारलं होतं. “अरे तुम्ही सगळे मला एवढ शांत बसायला
सांगताय,काय कारण ? शांत बसून मलाकाय शांततेच नोबेल
पारीतोषीक देणार आहात की काय? ” (माझा आपला उगाच भ्रम होता.) जसं बेस्ट
कँडेट ऑफ द इयर ,बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, तसं बेस्ट शांतता पर्सन ऑफ द इयर रत्नाकर
पवार.....? मी जरा विचार केला समजा पत्रकार परीषदेत
पत्रकार शांत बसून राहीला तर काय होईल ? मझ्या एका मित्रानी सांगीतले खजगीत प्रश्न विचारले तर बरच काही
मिळेल. मी समजत होतो आपण नाही का मेरीट हुकलेल्या मुलांना सांगतो अजुन थोडा अभ्यास केला असता तर मेरीट..... मला
पण माझ्या बाबतीत तसंच वाटत होतं. नंतर असं व्हयला नको,अजुन शांत बसला असता तर
नोबेल मिळालं असतं.
बरं
यांची आज्ञा मी सुरवातीला सोमवार आणि शनीवारी पाळत असे. त्याला कारण असे होते की,
सोमवारी श्री. राममोहन खानापुरकर सरांच लेक्चर असायचं. (मराठीत व्याख्यान. तास,
प्रवचन जो काही साजेसा शब्द असेल तो.)ते एकदा मेल एक्सप्रेस प्रमाणे सुटायचे ते
थेट ८ वा आमची चुळबुळ सुरु झाल्यावर थांबायचे. ते अगदी डहाणू, पालघर, सुरत पर्यंत.! दुसरं म्हणजे शनीवारी महेश म्हत्रे सर.
त्यांनी मला एकदा तंबीच दिली. “मधे प्रश्न विचारत जाउ नकोस, शेवटच्या पाच मिनांटात विचारत जा.”इथे मला ट्रेनचा भोंगा आठवला.
इतरवेळी उभयतांमध्ये फक्त मी एकटाच
एखाद्या क्लायमँक्सच्या सीन ला थेटरमध्ये मध्येच उठावं तसे प्रश्न विचारत होतो.
मला वाटतं सरही कधी कधी वैतागत असतील मला. याचा खुलासा शेवटी प.पांच्या लेक्चरला
झाला. काहीतरी विषयावरुन सर माफकरण्याचं महत्व सांगत होते. एकदा एकनाथ महाराज नदीत
आंघोळ करत होते. त्यांच्या हाताला विंचू चावला. तेंव्हा लोकांनी त्यांना विचारलं “ एकनाथ महाराज, त्या विंचवाला का नाही
ठेचले ?”तेंव्हा एकनाथ महाराज म्हणाले “चावणे हा विंचवाचा धर्म आहे.माफ करणे हा
माझा.”(माझा म्हणजे संत एकनाथांचा) मी प्रश्न
विचारणार होतो, “विंचु चावला हे भारूड .....” ते सरांच्या लक्षात आले असावे .सर पटकन
म्हणाले “तुला मी कीती वेळा माफ केलं असेल.”
त्याचं झाल असं सर मराठी नियतकालीकांचा
इतिहास देणार होते. तो घ्यायला कोणीच जात नव्हतं. तेव्हा बोलता-बोलता सर म्हणाले
गेल बरेच दिवस मी सुट्टीवर आहे. तेंव्हा मी सरांना विचारलं होतं “ सर VRS घेतली का ?”जाउदे
बरं झाल माफ केलं नाहीतरी मला भीती होतीच. अजून बरेच पेपर बाकी होते. प्रेस लॉच्या
सरांना ना-ना त-हेचे प्रश्न विचारायचो. सर उत्तरं ही द्यायचे पण पेपरात फक्त दोनच
मार्कांनी पास झालो होतो. यावेळी “अती शहाणा त्याचा बैल रीकामा ” या म्हणीची आठवण आमच्या वर्ग
भगीनींना झाली नसती तरच नवल !
एकदा आमचे सचीन परब सर विचारत होते. “तुम्ही पुढे काय होणार ?”थोडक्यात ओळखपरेड घेत होते. सगळे BSC, BA वाले. मोठ-मोठ्या कॉलेजातले चांगले मार्क
मिळवलेले. मला माझा भुतकाळ आठवला. माझं एतीहासीक प्रसिध्दी असलेलं कॉलेज माझे
लास्ट इयरचे 35%........हा तर सगळे सांगत होते. मी रिपोर्टर
होणार, मी इलेक्ट्रॉनीक मीडियामध्ये जाणार, मी न्यूज रीडर होणार, मी अँकर होणार,
(अगदी बोबडे सुध्दा...!)
अशी उत्तरं सगळे देत होते. माझा नंबर आला मी म्हटलं २५ रिपोर्टर पाच न्युजरिडर
(बोबडे धरून.) पाचही मराठी चँनल वर IBN लोकमत पासून ते साम, स्टार पर्यंत,
आमच्याच कॉलेजचे न्यजरिडर. यात खुप काँपीटीशन आहे . मी सरळ बाँब टाकला. ‘मी संपदक होणार’ ! सगळे तोंडात बोटे घालण्याऐवजी तोंडावर
हात धरुन हसत होते. म्हटलं “ बैठ ना चाहो तो वहा बैठ के कोई न कहे उठ, और बोल सको तो ऐसा बोल के
कोई न कहे चुप !.”
अनुभवाचे बोल चांगले आहेत....पण मराठीचे तीनतेरा आहेत....
जवाब देंहटाएं