बुधवार, 18 अप्रैल 2012

आपण काय शिकलो ?


             
                                                आपण  काय शिकलो ?

          वरील शीर्षक हे आमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीत  म्हणजेच शाळेत असताना धड्या शेवटी असायचे . इतिहास ,भूगोल ,विज्ञान . विषयांच्या पुस्तकात "आपण काय शिकलो ?" या शीर्षका खालील ठळक मुद्दे घोकमपट्टीने पाठ करावे लागायचे.आज हाच प्रश्न राहून राहून  डोळ्यांसमोर येतो . आपण काय शिकलो?
खरतर हुशार मुलांची आपली संकल्पना वेगळी आहे.जी मुल शाळेत जाऊन शिकतात ,क्लासला जाऊन घोकतात,परीक्षेत जाऊन ओकतात आणि निकालात चमकतात .ती म्हणजे  ब्राहाम्हद्यानी,स्कॉलर .पण या ठोकळेबाज ज्ञाना  पेक्षा आपल्याला आपल्या समूहातील माणसं बरंच काही शिकवतात.माझी शाळेच्या नावानी बोंब होती.पण अभ्यासाव्यतिरिक्त बरच काही शिकता आलं.
          मार्च -ऑक्टोबर-मार्च च्या कुरुक्षेत्रातून सुटल्यावर आमची पाऊले आपसूकच "सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ऍं इकोनोमिक्स " चर्चगेट  कडे वळाली . कॉलेज ने हि तेवढ्याच आत्मीयतेने आगत- स्वागत केलं. आता शिकण्याची सुरवात खऱ्या अर्थाने झाली.कॉलेज तसं लांब चंच निवडलं.कारण" दृष्टी आड सृष्टी ."
रोज घाटकोपर ते चर्चगेट चा  प्रवास  आमच्या ज्ञानात भर घालत होता .लेक्चर नंतर आमच्या मित्र मंडळीची  भाषा म्हणजे "आय्च्यागावात आणि बाराच्या भावात.... !"पुढे  गेट वे , NARIMANPOINT ,फोर्टच पाणी लागून आमच “ENGLISH IS NOT SO BEYOND TO FATHER MOTHER & चादर !सुरवातीच्या काळात ओठ  काळे  होतील ,STAYMINA कमी होईल म्हणून सिगारेट पिणारी मंडळीशेवटच्या वर्ष पर्यंत मोक्काज मध्ये जाऊन हुक्काज चे वेग वगेळे फ्लेवर आणि सिगार वर phd . करून बसले. इथल्या NARIMANPOINT वर मित्र मित्र फिरताना बऱ्याच जणांना मैत्रिणी ची सांगत लाभली.पुढे बॉयफ्रेंड नियम अटी लागू करतो .म्हणून प्रेमाचे सागर आटले.मजनूंना आपलं दुख:व्यक्तं करायला मित्र मंडळी होती . याच  नरीमन point वर मी एकटा लेक्चर बंक करून  बसायचो .(कारण माझी पाटी कोरी होती)     वा-याच्या वेगा सोबत लाल-पिवळ्या दिव्यांच्या गाड्या भुर्रकन जायच्या.रस्त्यावरले ट्राफिक पोलीस दचकून सलाम ठोकायचे.गाडीत साहेब असोत नसोत .फोरेन ला या ट्रफिक पोलिसांना  बॉबी म्हणतात .आणि आपल्याकडे .....!जाऊदे .तू काय करणार मी काय होणार अशावेळी  आम्हा ठरविक मुलांचा  इंट्रेस सिस्टम ची जमादारी करण्यात जास्त होता.मी रंग दे बसंती मधला डायलॉग मारायचो "जिंदगी जिने के सिर्फ दो तरीके होते हे “ एक जो होराहाहै उसे होने दो सेहते जाओ,और दुसरा जेम्मेदारी उठाव उसे बदलनेकि."
     मग लाल दिव्यातला  साहेब होण्याची जबरदस्त इच्छा व्हायची . नापासचा शिक्का लागल्यावर भूतकाळातले  अनुभव, ते मी साहेब झाल्यावर काय होईल? ची स्वप्नं दिवसा ढवळ्या डोळ्यासमोर तरंगायची.तो चकचकीत हाय वे ,प्रशस्त समुद्र  किनारा  आमची गाडी १०० च्या स्पीड ने धावते,आपले इंडियन  बॉबी आम्हाला दाणकन  सलाम  ठोकतात....!मग आमची मित्र मंडळी मी कमिशनर झालोतर .....च्या हवेत गोळ्या मारू लागतात .या ध्येया कडे जाताना अनेक सनदी अधिकाऱ्यांची आत्मचरित्र ,पुस्तक  वाचनात आली ,त्यापैकी फारुख नाय्कुडे सरांची siac आमच्या जवळच होती. त्याचं " स्टील फ्रेम "हे पुस्तक ,त्यातली मुलं एक हुशारी  सोडली तर आमच्या सारखीच होती.या पुस्तकात तरुण मुलांची मानसिकता प्रत्यक्षात  अनुभवली . पुण्याचे विषय सोडून फिरून बोलणारे ,मुंबई चे  आमच्या सारखेच हवेत गोळ्या मारणारे आणि कोल्हापूरचे रांडच्या शिवाय सुरवात करणार नाहीत.हे सगळं अनुभवलं .आमच्या कट्ट्यावरती माझ्या नापीक डोक्यातल्या सुपीक कल्पनांना दाद होती.
      माझी सडपातळ देहयष्टी ,चंचल-बडबडा स्वभाव ,एकना धड भराभर चिंद्या अशी जीवन शैली ,खांद्याला लटकवलेली  fashionable झोळी ,नुकतीच फुटलेली दाडी.इतक्या गोष्टी पुरे होत्या पत्रकार म्हणून टोपण नावानी दगड मारायला.बरं पत्रकार कुठचे? तर "दैनिक बोंबाबोंब" चे !तशी सगळी बोंबाबोंब होती म्हणा .पुढे टि.वाय.नंतर के.सी.कॉलेज ला पत्रकारीते साठी ट्राय केलं  आणि आशर्यम्हणजे प्रवेश मिळाला!पुढे आमचे RDB मधले D .J . कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात गेले .मग आखीव जीवनातल्या रेखीव वेळा पाळत S M S ,इमेल,मधून विचारपूस होते तुझ  काय चाललंय?मी पुन्हा तोच डायलॉग मारतो ,"जिंदगी जीनेकेदो हि तरीके होते हे  ..."
मग इरेलापेटून तिघा- चौघां मधले I .A .S , I .P .S  ,I .F .S , जागे होतात .U .P.S.C , M.P.S.C ,चा फॉर्म भारतात ,काही दिवसांनी पार्ट टाईम  काम शोधतात ,अभ्यास चालू ठेवतात .पुन्हा एक S.M.S येतो ,"वो कॉलेज के दिन वो दिन भर गप्पे करना,कभी जिंदगी गुजरती थी हसने हसाने में , आज वक्त गुजरता हे कागज के नोट कामाने में. " पुन्हा आठवण होते ,एवढ सगळ करून आपण काय शिकलो?


                                                                                                रत्नाकर पवार
                                                                                                9820501363
                                                      spratnakar@gmail.com