मंगलवार, 10 मार्च 2015

मला पडलेला प्रश्न

1.      मला पडलेला प्रश्न

मला कधी कधी प्रश्न पडतो
समृद्धतेने नटलेल्या आपल्या देशात
 चमत्कारांचा वर्षाव होतो.
प्रत्येक वेळी पापं मिटवण्यासाठी 
देव इथेच जन्म घेतो.
मला कधी कधी प्रश्न पडतो की,
इतके देव, संत महात्मा या भुमीत 
जन्म घेऊन पण
 समाज असाच दरीद्री का राहतो
परंपरेने नटलेल्या आपल्या देशात
 मुलगाच बापाची जागा चालवतो
व एकविसाव्या शतकात 
घराणेशाही राबवतो.
नाव दुर्गा लक्ष्मी असलं तरी 
बाप मात्र लाखो रुपये हुंडा मोजतो.
काय खरंच आपल्याला
 आपल्या देशाचा अभीमान वाटतो
भ्रष्टाचार थांबला पाहिजे
 असं प्रत्येक जण बोंबलत असतो
पण आपल्या कामासाठी लाख रुपये 
टाकून नेत्यांचे तळवे चाटत असतो.
मग एखादा संवेदनशील
 माणूस समाज सुधारक होतो,
पहिले स्वतः सुधारतो, 
मग समाज सुधारण्याची  क्रांती करतो,
मग क्रांती करून समाज सुधारक मरतो 
आणि समाज मात्र पूर्व पदावर येतो.

काय खरंच आपल्याला 
आपल्या देशाचा अभीमान वाटतो ?