मंगलवार, 22 मई 2012

आमचं के.सी.कॉलेज म्हणजे....

                                                 आमचं के.सी.कॉलेज म्हणजे....

स्थळ आमचा मराठी जर्नालीझमचा (म्हणजे मरीठी पत्रकारीतेचा )वर्ग. सगळे विशी-पंचविशीतले तरुण-तरुणी.(काही अपवाद वगळता) पत्रकार म्हणजे प्रश्न विचारायची मुभा असलेला माणुस. सचीन सरांच्या भाषेत सांगायचं तर मोकाट माणुस. बरं वर्गामधे नव्याने दाखल झालो होतो. पहीलं लेक्चर पराग पाटील सरांचं उर्फ पपांच होतं. पत्रकरितेत अँडमिशन का घेतलं ?सर सगळ्यांना विचारत होते.
     कुणी म्हणत होत देश सुधारण्यासाठी , कुणी भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी, कुणी आणखीन काय. माझा नंबर आला मी म्हटलं मला जे माहीत आहे ते इतरांना सांगायला आवडतं. त्यासाठी पत्रकार व्हयचं आहे.’’मी पुढे येणारी केसं सावरत म्हटलं. सरांनी मला पहिल्याच दिवशी झुल्फीकार अशी उपमा दिली.मला पाकीस्तानचे झुल्फीकार अली भुत्तो आठवले. आमच्या वर्ग भगीनींनी काही दिवसांनी मला झुल्फीकार म्हणून संबोधण्यास सुरवात केली.
     पुढे लेक्चर होत असताना मी सवयीच्या (दुर्गुणांनी)गुणांनी सरांना मधेच प्रश्न विचारायचो. सर (कधी-कधी) उत्सफुर्तपणे उत्तरं द्यायचे. माझ्या इतर मित्र-मैत्रीणींना (आत्तापर्यंत एक दोन झाले होते.)त्यांना त्रास व्हायचा. त्यांची ट्रेनमिस होण्याची दाट शक्यता असायची. कालांतराने हे माझ्यालक्षात आले. पण हे लक्षात येण्या आगोदर भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती आणि महीला मंडळ यांचा प्रेमळ सल्ला असायचा.तु जरा शांत बसत जा.”कधी कधी नुस्ता दृष्टीक्षेपातुन तर कधी थेट लेक्चर चालु असताना. आमने- सामने !
     त्यआधी मी त्यांना विचारलं होतं. अरे तुम्ही सगळे मला एवढ शांत बसायला सांगताय,काय कारण ? शांत बसून मलाकाय शांततेच नोबेल पारीतोषीक देणार आहात की काय? (माझा आपला उगाच भ्रम होता.) जसं बेस्ट कँडेट ऑफ द इयर ,बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, तसं बेस्ट शांतता पर्सन ऑफ द इयर रत्नाकर पवार.....? मी जरा विचार केला समजा पत्रकार परीषदेत पत्रकार शांत बसून राहीला तर काय होईल ? मझ्या एका मित्रानी सांगीतले खजगीत प्रश्न विचारले तर बरच काही मिळेल. मी समजत होतो आपण नाही का मेरीट हुकलेल्या मुलांना सांगतो  अजुन थोडा अभ्यास केला असता तर मेरीट..... मला पण माझ्या बाबतीत तसंच वाटत होतं. नंतर असं व्हयला नको,अजुन शांत बसला असता तर नोबेल मिळालं असतं.
      बरं यांची आज्ञा मी सुरवातीला सोमवार आणि शनीवारी पाळत असे. त्याला कारण असे होते की, सोमवारी श्री. राममोहन खानापुरकर सरांच लेक्चर असायचं. (मराठीत व्याख्यान. तास, प्रवचन जो काही साजेसा शब्द असेल तो.)ते एकदा मेल एक्सप्रेस प्रमाणे सुटायचे ते थेट ८ वा आमची चुळबुळ सुरु झाल्यावर थांबायचे. ते अगदी डहाणू, पालघर, सुरत पर्यंत.! दुसरं म्हणजे शनीवारी महेश म्हत्रे सर. त्यांनी मला एकदा तंबीच दिली. मधे प्रश्न विचारत जाउ नकोस, शेवटच्या पाच मिनांटात विचारत जा.इथे मला ट्रेनचा भोंगा आठवला.
            इतरवेळी उभयतांमध्ये फक्त मी एकटाच एखाद्या क्लायमँक्सच्या सीन ला थेटरमध्ये मध्येच उठावं तसे प्रश्न विचारत होतो. मला वाटतं सरही कधी कधी वैतागत असतील मला. याचा खुलासा शेवटी प.पांच्या लेक्चरला झाला. काहीतरी विषयावरुन सर माफकरण्याचं महत्व सांगत होते. एकदा एकनाथ महाराज नदीत आंघोळ करत होते. त्यांच्या हाताला विंचू चावला. तेंव्हा लोकांनी त्यांना विचारलं एकनाथ महाराज, त्या विंचवाला का नाही ठेचले ?”तेंव्हा एकनाथ महाराज म्हणाले चावणे हा विंचवाचा धर्म आहे.माफ करणे हा माझा.”(माझा म्हणजे संत एकनाथांचा) मी प्रश्न विचारणार होतो, विंचु चावला हे भारूड ..... ते सरांच्या लक्षात आले असावे .सर पटकन म्हणाले तुला मी कीती वेळा माफ केलं असेल.
            त्याचं झाल असं सर मराठी नियतकालीकांचा इतिहास देणार होते. तो घ्यायला कोणीच जात नव्हतं. तेव्हा बोलता-बोलता सर म्हणाले गेल बरेच दिवस मी सुट्टीवर आहे. तेंव्हा मी सरांना विचारलं होतं सर VRS घेतली का ?”जाउदे बरं झाल माफ केलं नाहीतरी मला भीती होतीच. अजून बरेच पेपर बाकी होते. प्रेस लॉच्या सरांना ना-ना त-हेचे प्रश्न विचारायचो. सर उत्तरं ही द्यायचे पण पेपरात फक्त दोनच मार्कांनी पास झालो होतो. यावेळीअती शहाणा त्याचा बैल रीकामा  या म्हणीची आठवण आमच्या वर्ग भगीनींना झाली नसती तरच नवल !
     एकदा आमचे सचीन परब सर विचारत होते. तुम्ही पुढे काय होणार ?”थोडक्यात ओळखपरेड घेत होते. सगळे BSC, BA वाले. मोठ-मोठ्या कॉलेजातले चांगले मार्क मिळवलेले. मला माझा भुतकाळ आठवला. माझं एतीहासीक प्रसिध्दी असलेलं कॉलेज माझे लास्ट इयरचे 35%........हा तर सगळे सांगत होते. मी रिपोर्टर होणार, मी इलेक्ट्रॉनीक मीडियामध्ये जाणार, मी न्यूज रीडर होणार, मी अँकर होणार, (अगदी बोबडे सुध्दा...!) अशी उत्तरं सगळे देत होते. माझा नंबर आला मी म्हटलं २५ रिपोर्टर पाच न्युजरिडर (बोबडे धरून.) पाचही मराठी चँनल वर  IBN लोकमत पासून ते साम, स्टार पर्यंत, आमच्याच कॉलेजचे न्यजरिडर. यात खुप काँपीटीशन आहे . मी सरळ बाँब टाकला.मी संपदक होणार ! सगळे तोंडात बोटे घालण्याऐवजी तोंडावर हात धरुन हसत होते. म्हटलं बैठ ना चाहो तो वहा बैठ के कोई न कहे उठ, और बोल सको तो ऐसा बोल के कोई न कहे चुप !.

रविवार, 6 मई 2012

मी पाहिलेलं सेमीनार


आजकाल ब-याच पेपर्स मध्ये शैक्षणीक पुरवण्या दिल्या जातात. त्यामध्ये करीअर गाईड करणा-या मोफत व्याख्यानांची पैसे देउन जाहिरात केली जाते. कॉलेजमध्ये कुठेतरी वेळ काढावाम्हणून आणि जरा चांगलं इंग्लीश कानावर पडावं म्हणून आम्ही दोघा तिघांनी हे फुकट सेमिनार अटेंड करायचं असं ठरवलं.
त्याचं झालं अस की या आधी माझ्या एका मित्रानी या आधी एक सेमीनार अटेंड केलं होतं. त्याचा अनुभव चांगला होता. संध्याकाळी साधारण ५ ते ६ च्या दरम्यान हे सेमीनार आयोजीत केलं जातं. या सेमीनार मध्ये एक नोट पँड, चांगलसं पेन आणि अमुक-तमुक कॉर्सेस चे बुकलेट,ब्राउशर, पँप्लेट्स फ्री(तेवढीच रद्दीत भऱ) . महत्वाचे म्हणजे चहा,कॉफी अल्पउपहार पण असतो. आद्यावत माहीती मिळते तो भाग ज्ञानाचा झाला. आपण मजा करायला चाललो आहोत. म्हणजे मजे मजेत घेतलेलं ज्ञान चांगलं लक्षात राहतं.
हां तर मी मी पाहीलेल्या सेमीनार बद्दल सांगत होतो.तर आम्ही तिघे जण सेमीनारला गेलो. अध्यक्षांच्या भाषणा आधी सुत्रसंचालकाने आमचं स्वागत केलं. त्यानंतर सुत्रसंचालकानी त्यांच्या चिवडा- वेफर असोशीएशन च्या अध्यक्ष, प्रमुख पाहूणे आणि व्याख्याते यांना दिवा-बत्ती ,अगरबत्ती, सरस्वती पुजन करायला सांगीतली. हे सगळं झाल्यावर अध्यक्षांनी थोडसं (म्हणजे तब्बल २० मिनीटे) भाषण केलं त्यानंतर मान्यावरांच्या हस्ते अमुक-तमुक परिक्षेत टॉप केलेल्या किर्तिवंतं,बुध्दीवंत आणि संस्थेच्या निष्ठावान लोकांचा सत्कार केला.  आमच्यासारखे मतीमंद, गतीमंद  खाली बसून टाळ्या वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवत होते.
त्यानंतर झाला चहाचा ब्रेक,चहा, चिवडा आणि कचोरी संपवून माझामित्र निघायच्या तयारीत होता. मी म्हटलं ते संस्थेचे कार्यकर्ते तुझा हेतू ओळखतील. आता खल्लया कचोरीला आणि ढोसल्या चहाला जग. काय असतील ते तास दोन तास इथे ढेकर देत बस. मग तो जरा खजील होउन बसला. मध्यांनानंतर निवेदकानी एका-एका व्याख्यात्यांची ओळख करुन दिली. त्यांचा बायोडेटा सांगताना आमच्या लक्षात आले की एकही व्याख्याता पीएचडीच्या खाली नाही. आमच्या कॉलेज चे प्रिंसिपल सोडले तर कोणताच पीचडी धारक आम्ही बघीतला नव्हता.
त्यात बरेचसे आम्हाला आय स्पेशलीस्ट वाटत होते. आमच्या भाषेच आय स्पेशलीस्ट म्हणजे मी-मी म्हणवणारे . अगदी साध्या भाषेत सांगायचंतर स्वत:ला शाहाणे समजणारे. त्यांच्या भाषणात त्यानी जगातली वाढती महागाई, बेरोजगारी, स्पर्धा इ.इ ची स्टँटँस्टीकल आकडेवरी सांगून जमलेल्या मुलांना आणि पालकांना घाबरवून सोडलं. मग पुढे आमच्या अमुक-अमुक संस्थेतून इतके लाख भरुन तुम्ही आमचा xyz कोर्स करा.आमच्याकडे कँपस इंटरव्ह्यू साठी जगात ल्या इतक्या- इतक्या इंडस्ट्रीज येतात. आणि आजच्या भयानक वास्तवातून तुम्ही थेट युरोप-अमेरिकेत एक्सपर्ट म्हणून (इंपोर्टेड माला प्रमाणे) एक्सपोर्ट होता.  तुम्हाला एक्सपोर्ट करायची जबाबदारी आमची म्हणजे सस्थेची. वगैरे-वगैरे.
तसंच तुम्हा इच्छुक असाल तर तुमचं रजीस्ट्रशन फ्रि करुन आम्ही तुम्हाला आमच्या कोर्सपासून ते तुमच्या फॉरेनटूर पर्यंत सगळं व्यवस्थापन करण्यासाठी इथे ऐसीवैसी बँकआपव्या सेवेस हजर आहे.पुढे कायझालं कि आमच्याकडुन भरुन घेतलेले फॉर्म आणि त्यावर असणारी आमची डिटेल यांचा संस्थेच्या लोकांनी कसून पाठपुरावा केला. सारखे घरी फोन करून आमचा कोर्स कसा चांगला आहे. हे आमच्या सुजाण आणि सुज्ञान पालकांना पटवून देण्याचा प्रयत्यन केला. त्याचा परीणाम असा झाला की ...आधीच्या चार केट्या सोडवा गप्प डिग्रीघ्या मग करा काय करायचेत ते कोर्स, आणि बाहेर गावी जाउन काय नोक-या करणार इथे जेवलेलं ताट धुता येत नाही तर....   म्हटलं आधीच हाऊस त्यात पडला पाऊस !

                                                                                                                रत्नाकर पवार,
9820501363