सोमवार, 19 फ़रवरी 2018

त्याचं व्हर्चुअल प्रेम

तो एका न्यूज चॅनलमध्ये काम करत होता.
न्यूज चॅनलसाठी त्याने जास्त पगार आणि सुविधा असलेली, 
विशेष म्हणजे आठवड्याला दोन सुट्ट्या असणारी
लोकसत्ताची वेबसाईट सोडली आणि या मायाबाजारात प्रवेश केला.
तो कॉलेजला असताना कधी कधी नरिमन पॉइंटला एकटाच सकाळी जायचा.
तिथे असलेल्या ऑबेरॉय - ट्रायडन्ट हॉटेलमध्ये कधीतरी जायचं त्याने स्वप्न पाहिलं होतं.
अशी अनेक स्वप्न त्याने या समुद्राच्या किना-यावर बसून बघितली होती. 
तिथेच शेजारी असलेल्या लोकसत्तेत तो फक्त एका मुलाखतीत सिलेक्ट झाला होता.
पगार– पद दोन्ही वाढवून मिळाले होते. 
आता त्याचं घर मुंबईपासून 70 -76 किमी दूर असलेल्या ठाण्याच्या 
एका नव्याने वसलेल्या शहरात होते. 
घाटकोपरला असताना लवकर सुटल्यावरही तो कधी थेट घरी जात नव्हता. 
आता एक गाडी सुटली की खूप उशिर व्हायचा. त्याला या प्रवासाचा कंटाळा येत होता.
रोज किमान अडीच ते तीनतास प्रवासात जात होते. येऊन जाऊन पाच तास.  
अचानक एक दिवस त्याला वॉट्सअपवर समजले की चॅनलमध्ये आऊटपूटला संधी आहे.
मग त्याने इंटरव्ह्यू द्यायचे ठरवले. त्याला आणखीन पगार हवा होता.
त्याचाच एक सहकारी पगाराच्या थोड्याखूप फरकाने आऊटपूटला सिलेक्ट झाला.
त्याने चॅनलचा विचार डोक्यातून काढला. आता तो नेहमीच्या दिनचर्येत मग्न झाला.
तो शेअर मार्केटच्या एका सेमिनारला गेला होता. 
हा कार्यक्रम लोकसत्तानेच ऑर्गनाइझ केला होता.
त्याच्या डोक्यात होतं कधीतरी या कार्यक्रमाचं अँकरींग करायचं.
तितक्यात त्याचा फोन थरथरला,म्हणजे व्हायब्रेट झाला.
आता या सचिनला काय बोलायचंय?तो – बोल सचिन
सचिन – काय रे बिझी आहेस का ?
तो – अरे हो जरा कार्यक्रमात आहे.
सचिन – XXX बाहेर ये. जरा बोलायचं आहे.
तो – बोल, आता आवाज क्लिअर येतोय का ?
सचिन - हो. तर मी काय बोलत होतो तिकडे आऊटपूट ला काय निकाल लागला ?
तो – अरे साला तुमचा एचआर पगाराच्या बाबतीत अजिबात निगोशिएट करत नाही.
मग कंपनी स्विच करून काय फायदा ?
सचिन – भाई असाइंनमेंटला जागा आहे. तु ये.
तो – अरे पण आताच तुमच्या एचआऱने...
सचिन – अबे ते सोड तू आमच्या डिपार्टमेंटमध्ये उद्या ये XXX बाकी मी बघतो.
आता त्याचे मन त्या कार्यक्रमात रमत नव्हतं. त्याच्या डोक्यात सतत चॅनल सुरू होता.
याच चॅनलमध्ये त्याला अँकरटेस्टला बोलवणं आलं होतं.
अगदी शेवटच्या राऊंडला तो आणि एक लेमन चॅनलचा अँकर होता.
पण दोघांपैकी एकहीजण सिलेक्ट झाला नाही.
हो नाही म्हणत त्याने इंटरव्ह्यू दिला आणि तो सिलेक्ट झाला.
पगार सुट्टी याबाबत त्याने काँप्रमाइज केले. आता तो या धबगड्यात रमला होता.
रोज पाच तास ट्रॅव्हलींग आणि काम आता इतकंच त्याच्या जिवनात होतं.
एके काळी तो लेखक होता. आता लेखन फक्त स्वप्नात होतं.
त्याने एक दोनदा मोबाईल नोट्समध्ये लिहण्याचा प्रयत्न केला.
पण गर्दीला कंटाळून त्याने नाद सोडला.
सुट्टीच्या दिवशी त्याने लिहायला घेतले होते पण तोही प्रयत्न काही कारणाने फिसकटला.
आता त्याची लिंक कुठेच लागत नव्हती.
दिवस तसा नेहमीचाच, त्यांच्या चॅनलमध्ये एक मुलगी मराठवाड्यातून आली होती.
त्याने पहिले प्रथम फार लक्ष दिले नाही. इतरांशी गप्पा मारताना तिने तिचा परिचय सांगितला.
तिला डबेवाल्याचा नंबर हवा होता.
मधल्याकाळात तो घाटकोपरला एकटाच राहत असताना त्याने डबा लागवला होता. 
त्या परळमधल्या डबेवाल्याचा नंबर त्या मुलीला त्याने दिला.
अर्थातच तिने मागितल्यावर.
त्याच्याच डिपार्टमेंटमधला दुसरा एक मुलगा याच्याकडे त्या डबेवाल्याचा नंबर मागत होता.
ते का ? हे याला आत्ता कळाले. त्याने या गोष्टीकडे फरसे लक्ष दिले नाही.
त्याच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला की त्या मुलाने नंबर का मागितला होता.
याने तो विचार डोक्यातून झटकला.
याला मीडियातल्या मुली आवडंत नव्हत्या.
कारण ज्यांनी एकाच इंडस्ट्रीमधल्या मुलीशी लग्न केलं त्यांची काय त-हा झाली
ते याने जवळून पाहीलं होतं.
आणि मुख्य म्हणजे याला मीडियातल्या मुली म्हणजे प्लास्टीकची फुलं वाटायची.
जी दुरून टवटवीत आणि जवळ गेल्यावर गंध नसणारी होती.
म्हणून त्याने काही प्रपोजल्स नाकारले होते.
ती एकदा काहीतरी कामानिमित्त त्याच्याशी बोलायला आली 
आणि हा थोड्यावेळासाठी फ्लॅशबॅक झाला. 
त्याच्या डोक्यात आता कॉलेजच्या जमान्यातले विचार यायला लागले.
उभा चेहरा, सरळ नाक खूप एक्टिव्ह होती ती.
तो ड्यूटी संपवून ट्रेनमध्ये बसला तरीही त्याच्या डोक्यात आता तिचेच विचार होते.
तिचे नाव सुवर्णा आणि याचेही नाव माणिक होतं. ती सुवर्णा आणि हा माणिक.
तिच्या आणि याच्या नावात अलंकारिकपणा होता.
तिचा चेहरा याच्या प्लॅटॉनिक फिलिंगवाल्या क्रश सारखा होता. 
कामाव्यतिरिक्त तो तिच्याशी फारसं बोलंत नव्हता.
खूप औपचारिक बोलणं झालं होतं दोघांमध्ये.
ती आली की त्याला जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरळायच्याच.
पण दोघींमध्ये फरक होता. तिला म्हणजे त्याच्या पहिल्या क्रशला, प्रेमाला तिच्या 
सौंदर्याचा सुक्ष्ममाज होता.
त्याला स्वाभिमान गहाण टाकून प्रेम करायचं नव्हतं. त्या दोघांमध्ये एक गोष्टं कॉमन होती,
ती म्हणजेAttitude ! मित्रांच्या सांगण्यावरून त्याने तिला शेवटचे विचारले होते. 
झालेल्या ट्रॅजडीमधून तो बाहेर निघाला. खूप उशिरा त्या मुलीला तो कोण आहे हे कळाले.
त्याने तिचे विचार त्याचवेळी शिफ्ट डिलिट केले होते.
एस वाय बी. कॉम नंतर पहिल्यांदा त्याने एका मुलीकडे बघितले होते.
बीकॉम, पी.जी.डी.जे, एम.ए.सी.जे इतक्या डिग्य्रा घेतल्या
पण एकाही मुलीबाबत त्याने विचार केला नाही.
ती दिसायला रशियन किंवा युरोपीयन वाटायची.
तिची थर्ड लँग्वेजपण जर्मन होती.
सर्व कॉलनीतली आणि कॉलेजातली मुलं तिच्या मागे होती.
तिचा भाऊ आणि याचे काही मित्र कॉमन होते.
याने जाणिवपूर्वक तिच्या भावाशी दोस्ती केली नाही.
कारण मित्राची बहीण पटवणं याच्या तत्त्वात नव्हतं.
तिला प्रपोज करणा-या ब-याच मुलांचा तिने पाण उतारा केला होता.
प्रिन्सिपलकडे तक्रारी केल्या होत्या. ती होतीच इतकी सुंदर की.. जाऊदे.
आज खूप दिवसांनी त्याला तिच्यासारखी मुलगी दिसली.
तोच विचार करत तो ट्रेनमध्ये बसला. 
पण तिच्या म्हणजे पहिल्या क्रश मध्ये असलेला माज या मुलीत नव्हता. 
आता त्याने तिचा विचार झटकला. बसायला जागा भेटली आणि 
त्याने बॅगमधून पुस्तक काढून वाचायला सुरवात केली.
वाचनात मग्न असताना कधी बदलापूर आलं त्याला कळालंच नाही. 
तो उतरून घरी चालत गेला. तिच्या बद्दल त्याला प्रेमाची वगैरे फिलिंग अद्यापतरी नव्हती.
पण, त्याला तिला बघायचं होतं. दुस-या दिवशी तो ऑफीसला गेला. 
तो खूपवेळ ती येईल या भाबड्या आशेत काम करत होता. 
अचानक तिने मॅडमला मेसेज केला तिच्या घरी तिची आजी आजारी आहे.
ती तातडीने नांदेडला गेली.
ती केव्हा येणार हा प्रश्न त्याच्या डोक्यात होता, 
एक दोन दिवसात परत मॅडमला मेसेज आला की ती आता परत येणार नाही.
तिच्या आजीची काळजी घेणारं कोणी नव्हतं. 
आता त्याने स्वतःला परत कामात गाडून घेतलं.
घरी जाताना निवांत असला की त्याच्या डोक्यात तिचा विचार येत होता.
साला आपल्याला हवीतशी मुलगी आहे. पण, ती आपल्यापासून कोसो दूर आहे. 
बरं ती आपल्याला हवी तशी असली तरी आपल्याला भेटेल का 
तिचे विचार काय, तिची आवड काय हे सर्व सर्व त्याने तिला विचारलंच नव्हतं.
ती आता तिच्या घरी गेली. याने आता स्वतःला कामात गाडून घेतलं. 
पुन्हा तेच ते काम आणि घर.
मध्ये दोन एक वर्ष गेली. तो त्याच्या मित्रांसोबत लाँग जर्नी करणार होता.
पण दुर्दैव म्हणजे दोन्ही मित्रांना सुट्टी मिळाली पण याला नाही.
कालांतराने त्याच्या एका जिवलग मित्राचं लग्न झालं.
दोघे जिवलग याला मनापासून शिव्या देत होते.
याला सुट्टी नव्हती म्हणून प्लान कॅन्सल झाला.
लेह – लदाख मधला पँगॉग लेक, अरुणाचल प्रदेश, 
जिम कॉर्बेट आणि बांधवगडची सफारीतर बुक करून कॅन्सल केली. 
मग त्याच्या मित्रांनी गोवा प्लाने केला. 
पण हे दोघे शाकाहारी आणि उरलेला एक घरी न सांगता मांसाहार करणारा होता.
झालं गोवा कॅन्सल. मग याने परत गुगल केलं.
बेस्ट प्लेसेस इन महाराष्ट्र. त्याने ते प्लेसेस मित्रांना वॉट्सअप केले.
त्यांनी औरंगाबाद आणि नांदेड मधले प्लेसेस सिलेक्ट केले.
मग याने त्याच्या औरंगाबाद आणि नांदेडमधल्या सोर्सेसना
आणि मित्रांना विचारायला सुरवात केली.
तर प्रत्येकजण आपल्यापरीने वेगळी उत्तरं देत होता.
दरम्यान चॅनलमध्ये एक मुलगी इंटर्नशिपसाठी आला होती. 
औपचारिक बोलणं झाल्यावर ती मुलगी मराठवाड्यातलीच आहे असं कळलं.
याला असं लांबून शिक्षण आणि नोकरी करता येणा-या लोकांबद्दल प्रचंड आदर होता.
एकतर स्वतः कपडे धुवा, जेवणाचा डबा वेळेत घेऊन या. वेळेत परत द्या. 
इ.इ. इतरांप्रमाणे त्याने राबिया म्हणजे त्या इंटर्नमुलीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.
याचा पिकनिक प्लान त्याने राबिया इंटर्नला सांगितला नाही.
गप्पांमध्ये राबियाने त्याला प्रिंटमध्ये काम करायचं सांगितले. 
त्याने राबियाला टायपींग आणि इतर गोष्टींचा सराव करायला सांगितला. 
वेबला भविष्य आहे वगैरे बोलत असताना राबियाने त्याला मध्येच तोडले आणि
म्हणाली एक सांगू का सर”  तो म्हणाला “ बोलना.
राबिया तुम्ही आमच्या प्रतिक सरांसारखे आहात. तो कोण प्रतिक ?”
ते आम्हाला शोध पत्रकारिता शिकवायला होते. भास्कर मध्ये काम करतात. 
त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो अरे तो तर माझा जुना मित्र आहे. 
आम्ही एकत्रंच करिअर सुरू केलं.
नेहमीचा प्रवास संपवून तो घरी आला. दम टाकून थोड्यावेळात वायफाय ऑन केलं. 
नेहमीचेच मेसेज वाचले. उत्तरं दिली आणि फेसबूक ऑन केलं. 
तर राबियाने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. 
राबियाच्या फ्रेंडलिस्ट मध्ये ती असल्याचे बघून त्याला परत धक्का बसला. 
आता त्याला कधी एकदा ऑफीसला जाऊन त्या राबियाशी बोलतोय असं झालं होतं. 
पण दुसरा दिवस सुट्टीचा होता. तो दिवस त्याने कसातरी घालवला. त्याची मॉर्निंग होती. 
राबिया 11 च्या दरम्यान ऑफीसला आली.
तिच्यासोबत नमस्कार चमत्कार झाल्यावर राबिया कामात बिझी झाली. 
आजूबाजूला फार कोणी ऐकत नसताना त्याने विचारले.
अरे तु त्या सुवर्णाला कशीकाय ओळखतोस”? 
राबिया  ती माझी क्लासमेंट आहे सर.” 
आता त्याला परत धक्का बसला होता. 
त्याने चेह-यावरचे भाव आवरत काहीतरी औपचारिक बोलून वेळ मारून नेली. 
परत राबियाशी तिच्याबाबत विषय काढला नाही.
त्याचा चळवळ्या मित्रं सिद्धार्थ आता त्याचा फोन घेत नव्हता.
पहिले दोघे चळवळ आणि समाज या विषयांवर बराचवेळ गप्पा मारायचे.
आज त्याला आपल्याशी बोलायला वेळ नाही आणि 
आपल्यालाही त्याला परत परत फोन करायला आवडंत नाही. 
परत याचा Attitude मध्ये आला. जाऊदे बिझी असेल.
मग मराठवाड्यात फ्रेंडलिस्ट मध्ये कोण कोण आहे, 
तो शोधू लागला आणि त्याला एकदम आठवलं,
अरेच्चा ही पणतर नांदेड औरंगाबादची आहे!
मग याने हाय हॅलो सुरू केलं असं एकदम कसं विचारणार टुरीस्ट प्लेस बद्दल 
तिला हाल हवाला विचारला. पहिले प्रथम तीने तत्पर उत्तर दिलं.
ती एका लोकल न्यूज चॅनलमध्ये काम करत होती. 
तोच चॅनल जो ती सोडून मुंबईत आली होती.
तीचं व्यवस्थित चाललं होतं.
त्या दोघींमधलं साधर्म्य हा केवळ योगायोग असल्याचं समजून आता
त्याने तिचे विचार डोक्यातून झटकून टाकलेले असतात.
कसं बरं विचारावं तिला टुरिस्ट प्लेस बद्दल?
हा वॉट्सअप करू की नको या विचारात असतानाच तिचा वॉट्सअपचा डिपी बघतो. 
डिपी Abstract स्टोरी सांगणारा असतो.
दोन मुली अंधारातून चालल्या आहेत आणि एक छत्री त्यांना वाट दाखवते आहे.
असं काही तरी होतं. आता तो ठरवतो की जास्त डोक्याला ताण न घेता हाय करून बघूयात,
दिला रिप्लाय तर ठिक नाहीतर तिच्या व्यतिरिक्त इतर लोकांना विचारलं आहेच.
आता जर नाहीच दिला रिप्लाय तर जाऊदे. पुन्हा विचारायचेच नाही (Attitude).
मग फार डोक्याला ताण न घेता तिला वॉट्सअपवर हाय केले.
ती तात्पुरता रिस्पॉन्स देते. तो तिला फ्री टाइम केव्हा आहे विचारतो.
ती तिचा फ्री टाईम दुपारी एक च्या आधी व संध्याकाळी 9 नंतर असल्याचे कळवते.
तो तिला एकदा फोन करतो, पण ती उचलत नाही.
आता लाँग जर्नीसाठी यांच्याकडे बराच वेळ असतो.
तो सहज म्हणून आजूबाजूचा हलाहवाल विचारतो. 
थोडी कामाची चौकशी आणि मग विचारतो की मराठवाड्यात फिरण्यासारखं काय आहे?
ती पण कॉमन असलेली ठिकाणं सांगते. हॉटेल्स बाबत तिला फारशी माहिती नसते.
नांदेडातले गुरूद्वार, औरंगाबादेत बुद्धाच्या लेण्या आणि काही काही. 
या व्यतिरिक्त त्याला त्याच्या मित्रांना फारसे चर्चेत नसलेले आणि निसर्गरम्य 
स्पॉट दाखवायचे असतात. 
तो विचारतो आणि आश्चर्य म्हणजे ती सांगत जाते.
 नवीनच लग्न झालेल्या मित्राने ही टूर कॅन्सल केलेली असते. 
आता त्याला सुनवायची वेळ याची असते. 
तर त्याचा तो मित्र म्हणतो तू त्यावेळी सुट्टी काढले असती तर ?
प्लान परत एकदा कॅन्सल.
आता या दोघांमध्ये विचारांचे आदान प्रदान होते.
पिकनिकचा मुद्दा त्याच्या आणि तिच्या डोक्यातून गेलेला असतो.
त्यापलिकडे जाऊन तो तिच्याशी हलक्या फुलक्या विषयांवर चॅट करतो.
दरम्यान तिला गाण्याची आवड असल्याचे ती सांगते. 
हा एकेकाळी गाण्यात मास्टर असतो. 
विदर्भात एका मित्राच्या लग्नावरून येत असताना सर्वजण गाण्यांच्या भेंड्या खेळत होते. 
आणि हा पुस्तक वाचण्यात बिझी होता.
काहीतरी गाण्यावरून दोन टीममध्ये वाद झाल्याने याला डिस्टर्ब झाले आणि मग त्याने जो शब्द अडला होता त्यावरून गाणे सुचवले आणि परत पुस्तकात मग्न झाला. 
मग परत दुस-या टीमला अडचण आली आणि परत याला विचारले असता 
त्याने गाणे सुचवले. थोड्यावेळाने परत तेच.
आता याने पुस्तक बंद केलं आणि दोन्ही टीमला आव्हान केलं तुम्ही सर्वजण आणि मी एकटा.
असं करत त्या एकट्याने तीन चार तास सर्वांना झुंज दिली. 
पुढे त्याचा एक मित्रतर चक्क गाणी गुगल करत होता. 
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे तीला पण गाण्यात इंट्रेस्ट आहे.
बरं ती गाणं शिकत वगैरे होती. दोघांतल्या चॅटिंगमध्ये आता कौटुंबिक विषय येतात.
तिचा भाऊ डॉक्टर असून तो परदेशात स्थायिक झालेला असतो,
मग ही घरी लक्षं देण्यासाठी बॅक टू पॅव्हेलियन कशी झाली वगैरे वगैरे ती सांगते. 
आता याला तिच्याबद्दल खूप आदर आणि आपलेपणा वाटयला लागतो.
एकदा चॅटींग करताना याने तिला सरळ सांगितले की तु आहो जाओ करू नकोस,
सरळ अरे तुरेच कर. ती आग्रहाने म्हणत होती नाही तुम्ही मला सिनिअर आहात
मग याने नाद सोडला. तिच्या प्रोफाईमध्ये तर कुठे गाणी बघण्यात आली नव्हती.
तो आता वेळ मिळेल तसं तिच्याशी गप्पा मारत होता.
तिही त्याला रिस्पॉन्स देत होती. आता याला तिच्याशी गप्पामारताना फ्लॅशबॅकही व्हायला होत नव्हतं.
या मुलीशी चॅट करताना आता त्याला मागच्या ट्रॅजडीचा विसर पडला होता.
त्या दोघांमध्ये सामाजिक विषयांवर चर्चा झाली?
पुढे तिच्यासोबतच्या चर्चेतून ती बरीच आस्तिक आणि श्रद्धाळू असल्याचं याच्या लक्षात येतं. 
मराठवाडा म्हटलं की याला दुष्काळ, रखरखित ऊन,पाणी टंचाई, कार्यकर्ते, 
मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आणि एकनाथ आव्हाड या सर्व गोष्टी आठवतात.
ती मुंबईत आल्यावर महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाला जाते.
योगायोग म्हणजे तिला पहिली असाइंनमेंट पण मंदिराचीच भेटते.
दोघांच्या विचारांत जमीन आस्मानाचा फरक. तो नास्तिक आणि ती श्रद्धाळू.
फक्त हाच एक दोघांना दूर ठेवणारा दुआ. बाकी आवडी निवडी जुळत होत्या.
तो त्याचा ब्लॉगपण तिला वाचायला देतो. वाचन वगैरे तिचं फारसं नसावं. 
मुलगी आवडली की याचा पहिला प्रश्न असायचा आवडता लेखक कोण?
 तसं तिचा आवडता लेखक वगैरे असं काही नव्हतं. 
याने विचार केला की चला आपल्याला निदान आवडता लेखक तरी होता येईल का पाहूया.
म्हणून याने याच्या ब्लॉगची लिंक तिला फॉर्वर्ड केली आणि आश्चर्य म्हणजे तिला तो आवडला.
जेमतेम तीन चारशे जणांनी वाचला असेल.
त्याचा ब्लॉग आवडला म्हणून पहिली प्रतिक्रिया देणारा मुलगा औरंगाबादचा होता.
तो एका उजव्या आणि आक्रमक विचारांच्या पार्टीचा होता.
पुढे त्या मुलाने परत कधी फोन केला नाही.
पण फोन केल्यावर तो मुलगा तासंतास बोलायचा.
आता हीपण त्याच विभागातली.म्हणजे औरंगाबाद नांदेड त्याच भागातली.
तिने तोंड भरून कौतूक केलं. याच्यातला लेखक आणि मजनू दोन्ही परत जागे झाले.
वेळेचं भान विसरून दोघे चॅट करत होते.
आता त्याला नवीन संधी खुणावत होत्या. कामाची आता कटकट वाटायला लागली होती.
गेल्या दोनवर्षात त्याने फक्त आजारी असतानाच सुट्ट्या घेतल्या होत्या. 
बाकी चाळीस एक सुट्ट्या होत्या. 
याच जास्तीच्या सुट्ट्या बघून त्याने मित्रांना लाँग जर्नीचं गाजर दाखवलं होतं.
पुन्हा सुट्ट्या मिळण्यावरून वाद होत होते.
मग याने सरळ राजीनामा ठोकला.
असंच चॅट करत असताना तिने सहज विचारलं “ आज ऑफीसला नाही का गेलात ?”
त्याने सांगितले मी राजीनामा दिला आहे.
ती - मग आता ?
तो - आता वेट अँड वॉच.
#####s
तो मित्रांसोबत सिनेमा बघायला गेला होता. तो वेळेच्या एक तास आधी पोहोचला. 
त्याचे मित्र उशिरा येणार असल्याने त्यांचा पहिला शो कॅन्सल झाला.
तो मित्रांना सेल्फी काढून पाठवतो की मी मॉलमध्ये आलो आहे.
त्या दोघांचाही रिप्लाय येतो पहिल्या शो ला येता येणार नाही. 
मग याच्याकडे तब्बल दोन अडीच तास एक्सट्रा असतात.
आता इतक्या सकाळी मॉलमध्ये एकट्याने काय करायचे?
 अवती भवती सिनेमाला आलेले कपल्स,
हा त्यांच्या तोंडाकडे कितीवेळ बघणार, किती टाळणार,
मग याने फोन काढला आणि तिच्यासोबत चॅटींग सुरू केली.
चॅटींग सुरू करण्याआधी त्याने एक मिनिटभर स्वतःशी विचार केला. 
उठसूट या मुलीशी चॅट करतोय उद्या तीने याला आक्षेप घेतला तर 
पण ती तसं करणारी नाही. याने परत खडा टाकून बघितला.
तीने तात्काळ रिप्लाय दिला. मग याने चॅटिंगमागचे खरे प्रयोजन सांगितले.
मित्रांना यायला उशिर होत आहे.
एकटाच इथे तिथे बघण्यापेक्षा चॅटिंग काय वाईट
तो जो सिनेमा बघायला आला होता त्याने तोच सिनेमा तीला बघायला सांगितला. 
ती म्हणाली हो वेळ काढून बघेन. मग चर्चेची गाडी करिअर, स्वप्न इ.इ. पर्यंत येऊन ठेपली.
तीने सांगितले मुंबईला यायला आवडेल. त्याला तिचं स्वप्नाळू असणं खूप आवडायचं.
ती ध्येयवादी होती. ती इतर गोष्टींचा अभ्यास करत होती. 
तिलाही चॅनल नकोसा झाला होता. तसं तिने बोलून दाखवलं. 
ज्या ज्या विषयांत तिला रस होता त्या त्या विषयातले मास्टर्स याचे चांगले मित्र होते.
तो आता तिच्या सोबत चॅटिंगमध्ये बिझी होता.
त्याने ठरवून मित्रांना रिप्लाय केला नाही.
त्यांना वाटले की हा रागवला आहे. इथे हा चॅटींगचा आनंद घेत होता.
मित्र आले , त्यांना वाटलं की हा खूप रागवला आहे. 
पण त्याने राग वगैरे व्यक्त न करता तिच्या सोबत चॅटींग सुरूच ठेवली.
ते आले म्हणाले सॉरी. याने इग्नोर केलं. मित्र म्हणाला कायरे कुणाशी चॅट करतोस?
त्याने विषयाला बगल दिली. त्यांना इतकं तर ठाऊक होतं की कोणत्या मुलीशी 
हा चॅट करणार नाही.
मित्रांनी परत विचारले त्याने सिनेमाला उशिर झाल्याचे सांगत स्क्रिनकडे बोट दाखवले.
याची राग व्यक्त करायची स्टाइल आज नवीन होती. सिनेमा संपला तिघे आपल्या वाटेला गेले.
लग्न झालेला मित्र त्याच्या घरी गेला. दुसरा बॅचलर इंजिनिअर सेकंड शिफ्टला गेला.
आणि हा आता हॉटेलात जेऊन घरी निघाला.

मराठवाड्यात फिरायला जायचं. तिचा असलेला तो प्रांत, याला अनभिज्ञ होता.
मग त्याने सवयीप्रमाणे संपूर्ण मराठवाड्याचा इतिहास चाळला.
त्याला एखादी गोष्टं आवडली की संपूर्णपणे तो त्या गोष्टीची माहिती काढायचा.
मग ती व्यक्ती असो किंवा ठिकाण.
 मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकीय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.

मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी यामध्ये  8 जिल्हे आणि त्यात 78 तालूके आहेत.
गोदावरी ही मराठवाड्याच्या जिल्ह्यातून वाहते. 
जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक 
व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणीदेवगिरीकंधार किल्लेहेमाडपंथी मंदिरे
मकबरा, 52 दरवाजेपानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरेसंतांची भूमी पैठण,
तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.
मुक्ती संग्राम, नामांतराची लढाई, औरंगाबाद हे नाव कसं या शहराला दिलं.
इ.इ. इतकंच काय तिच्याशी बोलताना तिला इंप्रेस करता यावं
म्हणून याने औरंगजेबाचे चारित्र्य वाचायला घेतलं होतं.
त्यानंतर तो संभाजीचेही वाचणार होता.
रात्री त्याने तिला विचारले, अगं मला तुझे काम बघायचे आहे.
ती म्हणली युट्यूबला लिंक आहे एखादा चांगला शो देते
याने परत रिमाइंड केले पण तिचा रिप्लाय आला नाही. 
असेल काही कारण बिझी असेल म्हणून तिने नसेल केला रिप्लाय.
त्याने परत काही तरी विचारले आणि परत तिचा रिप्लाय नव्हता.
आता हा पुरता अस्वस्थ झाला. याचा इगो हर्ट झाला.
विनाकारण डिपी बघणं याच्या तत्त्वात नव्हतं.
नैतिकतेला धरून नाही म्हणून याने परत काही विचारले नाही.
दरम्यान त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता.
मित्राला व्याकरणाचे पुस्तक गिफ्ट द्यायचे होते.
तो गिफ्ट घ्यायला दादरला गेला. शब्द रत्नाकरनावाचे पुस्तक त्याने घेतले.
बराच वेळ होता. त्याने तिच्याशी चॅटिंग पुर्णपणे बंद केले होते.
पण डोक्यातले विचार एकाएकी कसे बंद होणार?
मुंबईतल्या तिच्या आवडत्या ठिकाणी तो जाऊन एकटाच उभा राहिला.
तासाभरात तो पुन्हा भानावर आला. त्याने हातातले पुस्तक चाळले. 
'शब्द रत्नाकर', रत्नाकर म्हणजे समुद्र ज्यामध्ये एक ग्लास पाणी ओतले काय 
आणि 10 ड्रम पाणी काढले काय त्याला काही फरक पडत नाही.
तो अथांग वाहण्याचे काम करतो. आता तो पुरता भानावर आला,
तो स्वातःशीच म्हणाला आपण कोणत्या गोष्टींच्या आठवणीने व्याकुळ होतोय ?
ज्या प्रत्यक्षात नव्हत्याच. हे सर्व व्हर्च्यूअल होतं. मृगजळ! 
सत्य परिस्थिती काय, ती आस्तिक आपण नास्तिक, आपण मुंबईत ती ज्याठिकाणी आहे
ते ठिकाण आपण फक्त नकाशातच बघितले आहे.
ना आपण कधी तिकडे जाणार आहोत. 
ती इकडे आली तर आपल्याला सांगण्याची शक्यताच नाही. 
आपण लेखक आहोत फँण्टसी लिहू शकतो, ती पुस्तकात वाचायला,
सिननेमात बघायला ठीक असते प्रत्यक्षात असं नसतंच काही.
त्या लिप्स्टिक अंडर माय बुरखा मध्ये नाही का त्या महिलांची स्वप्न असतात, 
पण ती प्रत्यक्ष उतरवताना त्यांना काय यातना सोसाव्या लागतात.
आपल्या या एकतर्फी प्रेमाचंही तसंच आहे.
संध्याकाळ होत आली होती. दादरची गर्दी वाढत होती.
तो आता दादरच्या दिशेने चालत होता. ती नितांत सुंदर आहे,
तिचा बॉयफ्रेंड नसेल कशावरून ? मराठवाड्यात जातिवाद प्रखर आहे.
वगैरे वगैरे विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होते. 
गर्दीचे धक्के त्याला वास्तवाची जाणीव करून देत होते. 
त्याने आता तिचा विचार मनातून रिमुव्ह केला आणि ट्रेन पकडली.
त्याची ही व्हर्च्यूअल लव्हस्टोरी त्याने चॅटिंगद्वारे त्याच्या
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मित्राला सांगितली, 
तर तो म्हणाला स्टोरी मस्त आहे पण व्हिज्यूअली करता येणार नाही. 
फक्त चॅटिंग आहे. प्रत्यक्षात शूट कसं करणार ?
 त्याच्या मनातली भावना अधिक गडद झाली. हे सर्व व्हर्च्यूअल होतं.
वास्तवाचा आणि याचा काही संबंधं नाही.
मित्राने हे सांगणं आणि बाजूच्या व्यक्तीच्या मोबाईलमधून गाण्याचा बॅकग्राऊंड येणं
 मै जानताहूं की तु गैर है मगर युहीं
त्याचे हात लॅपटॉप उघडून बसले चॅटिंगसाठी नाही तर फँण्टसी लिहण्यासाठी. 


शनिवार, 11 फ़रवरी 2017

एका सब एडिटरचं लव्हलेटर..

To,

डिअर ....

.....

त्यादिवशी तुला मुद्दाम विचारलं की 'तु गातेस का? तुला बघून कोणाला गाणं सुचलं नाही का ?’ असं विचारायचं होतं.. तुला बघून मला गाणी सुचली आहेत. ( दुस-या कुणीतरी लिहलेली). ती माझ्या ब्लॉगवरपण लिहली आहेत. गाण्यांचा मुखडा घेऊन मी एक लव्ह लेटर लिहलं आहे. After all I’m online Sub Editor.. ( प्लिज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कर आणि वाच..)
To …https://www.blogger.com/blogger.g?blogID=4694592318064766391#editor/target=post;postID=8629622953892334969 
मेरे खयालों की मलिका , मै शायर तो नही मगर ऐ हसी जबसे देखा मैने तुझको.. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है… क्या करे क्या नाकरे ये कैसी मुश्किल हाय…  केह दुं तुम्हे या चुप रहूं.. मेरे दिल में आज क्या है तु कहे तो मै बता दुं.. चाँद शिफारीस जो करता हमारी देता वो तुमको बता.. हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे..
पुढच्या चार पैकी एका ऑप्शनवर क्लिक कर.. 

1)      तुम जो आऐ जिंदगी में बात बन गई.. ( तात्काळ हो )

2    2)      नही नही अभी नही थोडा करो इंतजार... ( विचार करून सांगते )

3    3)      हम दिल देचुके सनम..(माझं आधीच सुरू आहे)

4   4)      ये गलीया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा... ( परत माझ्या मागे लागू नकोस) 

ये मेरा प्रेम पत्र पढकर के तुम नाराज ना होना.. (Now Ball is in Your Court ).

   तो क्या खयाल है आपका... 
   
   तुझाच... (अर्थातच हो म्हणालीस तर..)



रत्नाकर ऊर्फ रॉबीन

robin.pawar@rediffmail.com 


9867136313 

गुरुवार, 28 मई 2015

व्हेंटिलेटरवरची ‘गॉन केस’

  • रत्नाकर पवार , मुंबई (robin.paar@rediffmail.com) -
    तुमचा कोणी मित्र आहे, जो प्रेमात पडला आहे ? त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे? पण तिचं त्याच्यावर नाही. अशा मजनू मित्रांबाबत तुमचं मत काय आहे? त्यांना लांबूनच रामराम करता? समजवायचा प्रयत्न करता? की टाळता? प्रेम हे सगळ्यांच्याच आयुष्यात होतं. पण समजा काही कारणांनी ते सक्सेस नाही झालं, किंवा त्याला, तिला यामुळे डिप्रेशन आलं तर काय करता? अशावेळी तो किंवा ती टोकाची भुमिका घ्यायला जातात. ज्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
    माझे अनेक मजनू मित्र होते. ज्यांचं प्रपोजल नाकारलं गेलं. अफेअर तुटलं. मग या मंडळींना सगळे टाळायचे, कारण प्रेमात आंधळं होऊन यांनी मित्रमंडळींकडे लक्षच दिलं नाही. प्रेमभंग झाला आणि त्यांचे डोळे उघडले. मग काय, तिच्यासाठी मित्रांना वेटिंगवर ठेवणारा मजनू आपली अधुरी काहाणी सांगण्यासाठी मित्रांचा वेट करायचा. मग मित्रपण इसरुटकी सभीलायने व्यस्त असल्याचं दाखवायचे. माझा एक मित्र तिच्या बाबत सिरीअस नाही, गॅसवर नाही तर चक्क व्हेंटिलेटरवर होता. त्याला कोणीही जवळ उभं करत नव्हतं. त्यांनी मला राहून राहून अनेकदा त्यांची अधुरी कहाणी ऐकवली. रोज काही कारणांनी तिच्या आठवणी सांगायचा. प्रेमभंग झाल्यावर त्याने नोकरीही सोडली होती.
    त्याला मी समजवायचा प्रयत्न केला की बाबारे प्रेम त्यांच्यावरच करावं जे आपल्यावर करतात. तर तो म्हणायचा, ‘मित्रा हेच तु तिला जाऊन सांग’. वर म्हटल्याप्रमाणे केस अगदी हाताबाहेर गेलेली होती. सहानुभूती म्हणा किंवा समदुखी: म्हणा, मी त्याचं बोलणं निमुटपणे ऐकून घ्यायचो. एकदा असंच बराच वेळ तो कान खात होता. तो तिला परत विचारायला जाणार होता. तिला त्याच्यासोबत राहू नकोस, असा प्रेमळ सल्ला तिच्या निकटवर्तियांनी दिला होता. त्याने मला विचारलं बोलू कारे तिच्याशी? विचारू का तिला परत ‘ब्रेकअप के बाद’बद्दल? मी म्हटलं बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आईबापानी एका मुलीच्यामागे मरण्यासाठी तुला जन्म दिला नाही. आपल्याच तंद्रीत जगणं रात्री अपरात्री फोन करणं यामध्ये किती दिवस वाया घालवणार आहेस?
    हे  ऐकून पठ्ठ्याचे डोळे उघडले व्हेंटिलेटर वरची गॉनकेस आशादायी वाटू लागली. दुसरा दिवस उजाडला, नेहमीप्रमाणे तो तिच्या कॉलेजबाहेर वाट पाहात होता, स्वत:च्या समाधानासाठी तो तिच्यापुढे जाऊन उभा राहिला. त्याने तिला थांबवलं तिने अपेक्षेप्रमाणे नाहीच म्हटलं. याला आईबाप आठवले. हा मागे फिरला, बारकडे वळालेली पावलं पुन्हा घराकडे वळाली, घरी जाताना याने एक फॅमेलीपॅक आईसक्रिम घेतलं आणि नकार आई वडलांसोबत साजरा केला.
    चक्क दोन दिवसांनी मला फोन करून सांगितलं, की मित्रा मी तिच्यातून पुर्णत: बाहेर पडलो आहे. त्यादिवशी विचारल्यावर ती नाहीच म्हणाली. मग बारमध्ये न जाता घरी येऊन आईबाबांसोबत आईसक्रिम खाऊन सेलिब्रेट केलं. याचं क्रेडिट मात्र त्याने मलाच दिलं म्हणून कथेत त्याचं नाव न घालून मी त्याची परतफेड करत आहे. कारण अशा अनेक व्हेंटिलेटर वरच्या गॉन केसेसना यातून धडा मिळावा.

मंगलवार, 10 मार्च 2015

मला पडलेला प्रश्न

1.      मला पडलेला प्रश्न

मला कधी कधी प्रश्न पडतो
समृद्धतेने नटलेल्या आपल्या देशात
 चमत्कारांचा वर्षाव होतो.
प्रत्येक वेळी पापं मिटवण्यासाठी 
देव इथेच जन्म घेतो.
मला कधी कधी प्रश्न पडतो की,
इतके देव, संत महात्मा या भुमीत 
जन्म घेऊन पण
 समाज असाच दरीद्री का राहतो
परंपरेने नटलेल्या आपल्या देशात
 मुलगाच बापाची जागा चालवतो
व एकविसाव्या शतकात 
घराणेशाही राबवतो.
नाव दुर्गा लक्ष्मी असलं तरी 
बाप मात्र लाखो रुपये हुंडा मोजतो.
काय खरंच आपल्याला
 आपल्या देशाचा अभीमान वाटतो
भ्रष्टाचार थांबला पाहिजे
 असं प्रत्येक जण बोंबलत असतो
पण आपल्या कामासाठी लाख रुपये 
टाकून नेत्यांचे तळवे चाटत असतो.
मग एखादा संवेदनशील
 माणूस समाज सुधारक होतो,
पहिले स्वतः सुधारतो, 
मग समाज सुधारण्याची  क्रांती करतो,
मग क्रांती करून समाज सुधारक मरतो 
आणि समाज मात्र पूर्व पदावर येतो.

काय खरंच आपल्याला 
आपल्या देशाचा अभीमान वाटतो ?