गुरुवार, 16 मई 2013

आइस करिअर ?



आइस करिअर ? 

 






I T:I information technology,C: Communication, E: Entertainment.
    मित्रांनो आइसकरिअर हि नेमकी काय संकल्पना आहे ? सध्या उन्हाळा चालू आहे. मग हे आईस करिअर म्हणजे बर्फ वगैरे बनवणं किंवा आईश फॅक्ट्री काढणं असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. नेमकं याच आइस फँक्टरी बद्दल आज आपण जाणून घेउया. या आइस मधील I म्हणजे information technology, C म्हणजे Communication, आणि E.म्हणजे Entertainment.  या तिन्ही क्षेत्रात मुबलक मनुष्यबळाची गरज आहे.या क्षेत्रांच्या रुंदावणा-या कक्षा आपण पाहतो आहोत,अनुभवतो आहोत.
     तेंव्हा सर्वप्रथम ‘I’बद्दलजाणून घेउया. इंन्फाँरमेशन टेक्नाँलजी हे क्षेत्र सर्व व्यापी आणि सर्व स्पर्शी आहे. साक्षरतेसाठी आपल्या देशात जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे आज देशाने संगणक साक्षर (इंन्फोलिट्रेट)होण्याची गरज आहे. कारण, विजेचे बिल, पाण्याचे बिल, रेल्वे आणि इतर प्रवासाची तिकीटे, नेट बँकिंग यामुळे लोकांची गर्दी वरील कार्यालयांतून हळूहळू नाहिशी होत आहे. या सर्व गोष्टी आता संगणकावर उपलब्ध झाल्या आहेत. तेंव्हा आपल्याला संगणकाचे किमान प्राथमिकज्ञान असणे आवश्यक आहे.
    या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने दोन विभाग पडतात. ते म्हणजे साँफ्टवेअर आणि हार्डवेअर. साँफ्टवेअर मध्येही प्रोग्रामर आणि डेव्हलपर असे दोन भाग आहेत. नेटवर्किंग हे क्षेत्र देखील महत्वाचं आहे. या व्यतीरीक्त किंवा यांच्या जोडिला आपण सायबर लाँ या पर्यायाचा देखील विचार करु शकतो.
सायबर लाँ :  येत्या काहि वर्षात सर्व जग आणि जगभरातील सर्व व्यवहार हे देखील आँनलाइन होणार आहेत. आत्ता कुठे आपण दहावी नंतरचे फाँर्म आँनलाइन भरतो त्यात देखील सिस्टम मध्ये घोळ होतो. तर पुढला काळ  हा छोटाशिशू मोठा शिशू हि आपल्याला आँनलाइनच फाँर्म भरुन शाळेत पाठवावा लागणार आहे. हे सांगण्यासाठी जोतिष्याची गरज भासणार नाही. माध्याम कोणतंही  असुद्यात.तेव्हा भविष्यकाळात सायबरशी (संगणकाशी) निगडित गुन्हेगारी रोखण्यासाठी, किंवा कायदेशीर बाबींमध्ये माहिती असावी म्हणून सायबर लाँ गरजेचा आहे. हा सर्टफिकेट कोर्स सहा महिन्यांचा आणि एक वर्षाचा असून मुंबई, पुण्यात तो एशियन काँलेज आँफ सायबरलाँ, येथे करता येतो. तसेच हा काँर्स दुरस्थ पध्दतीने देखील करता येतो.

एथीकल हायकर :  हा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष जासूसी करण्याचे लायसन्स म्हटले तरी चालेल. कारण,एथीक्स म्हणजे नैतीकता, किंवा एखाद्या क्षेत्रात पाळायच्या मर्यादा. ज्याआपण कायदेशीर रित्या ओलांडू शकतो.(फक्त कायदेशीर कामासाठी.) यांचे काम म्हणजे पासवर्ड हँक करणे, किंवा कोणी पासवर्ड हँक केला असेल तर ते माहित करणे. आणि कंपनीच्या गोपनीय अहवालाशी निगडित असे काम या मंडळीना करावे लागते.यांना मोठमोठ्या बँका, अंतरराष्ट्रीय कंपन्या, सायबर पोलीस इ. ठिकणी बरीच मागणी आहे. सध्या जुलीयन असांजे यांच्या विकिलिक्सनी जे अंतरराष्ट्रीय पातळीवरल्या राजकरणाचे पितळ उघडं केलंय तेदेखील काहीसं यात येतं.
काय कराल या क्षेत्रात यायला ?  आयटी या क्षेत्रात चांगल्या संधी मिळाव्यात म्हणून बरीच मुलं ना-ना त-हेचे कोर्सेस करत असतात. प्रत्यक्ष नोकरीमध्ये इच्छे प्रमाणे आउटपूट, जाँब सॅटीसफॅक्शन न मिळाल्याने गोंधळलेले असतात. करीअर आयटी मध्येच करायचे असते, आवडही असते मग असे का होते ?  आपण ज्या संस्थेचे, युनिव्हर्सिटीचे सर्टफिकेट घेतले आहे त्याचे मार्केट मधील डिमांड बघणे केंव्हाही योग्य.
  एम.ओ.एस:  . मायक्रोसाँफ्ट आँफीस स्पँशालीस्ट सर्टफिकेट. हा काँर्स म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्या व संगणकाशी निगडीत कोणत्याही क्षेत्रात जाण्याच गेटपासच आहे असे म्हणावे लागेल. कारण हा काँर्स मायक्रोसाँफ्ट स्वत: परीक्षाघेउन सर्टिफाइड करते. ज्यावर स्वत: बिल गेट्स ची स्वाक्षरी असते. म्हणजे झालेच ! याची किंमत ५ ते ७ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे थातुर मातूर काँर्सेसना पैसे घालवण्यापेक्षा हे केंव्हा ही उत्तम.
या क्षेत्रातील ज्ञान वाढवण्यासाठी तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम पाहणे, तसेच तंत्रज्ञानाविषयीची मासिकं अधिक उपयुक्त ठरेल. सर्वात महत्वाचं म्हणजे डिमिस्टीफाइंग कंप्यूटर्स हे अच्यूत गोडबोले यांचं पुस्तक महत्वाचंच ठरेल. त्याचप्रमाणे नॅनोदय, तंत्रज्ञान, मुसाफीर हि मराठी मध्ये उपलब्ध असलेली पुस्तकं आणि आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहलेली इतर पुस्तकं उपयुक्त आहेतच. आयटी मध्ये करीअर म्हणून आपण डेटाएन्ट्री आँपरेटर पासून साँफ्टवेअर, हार्डवेअर इंजीनिअर, नेटवर्क इंजिनीयर, सायबर पोलीस,(याकरता पोलीसभरती प्रक्रिया आहे.) एथीकल हायकर, संगणक विक्रेता आणि शिक्षक किंवा संगणक तज्ञ म्हणून(काही वर्षाच्या अनुभवानंतर) काम करु शकतो.
                              C. फाँर Communication.
                मास कम्युनिकेशन म्हणजे जनसंपर्क हा प्रमुख्याने प्रकारांत येतो. जॅक ऑफ ऑल बट मास्टर्स ऑप नन् ही इंग्रजी म्हण पत्रकारांना लागू पडते. सगळ्या विषयातलं थोडं-थोडं ज्ञान पण पुर्ण कशातच नाही. आणि सर्व विषय हाताळण्यासाठी त्या-त्या विषयातील जाणकार असणे आवश्यक असते. म्हणूनच पत्रकारिता हा असा व्यावसाय आहे, ज्यात कोणतीही पदवी घेतलेली व्यक्ती करिअरकरू शकते. अर्थातच यालाही काही अटी आहेतच.
                १) पत्रकारीता  २) पीआर.प्रथम पत्रकारीते बद्दल जाणून घेउया. याक्षेत्रातही नव्याने आणि झपाट्याने बदल घडत आहेत. वृत्तपत्र, मासिकं म्हणजे प्रिंट जर्नालिझम, रेडियो-टि.व्ही. म्हणजे इलेक्ट्राँनिक जर्नालिझम एवढेच आपल्याला माहित आहे. परंतू वेब जर्नालिझम हा एक नवा पर्याय फार कमी लोक लक्षात घेताना दिसतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विकीलिक्स ! ज्युलीयन असांज हा या वेब साइट चा निर्माता. ज्याच्या मुळे पत्रकारीतेच्या या नव्या दालनाची सर्वांनी दक्षता घेतली.
  पत्रकारीतेत करीअर करण्यासाठी बारावी(कोणत्याही शाखेतून) नंतर आपण बीएमएम (बॅचलर इन मास मिडिया), किंवा इतर सर्टफिकेट काँर्सेस करु शकतो. बीएमएम केल्यास अधीक उत्तम. तसेच आपण पदवी नंतरही पत्रकारीतेत येउ शकतो. त्या करता कोणत्याही शाखेची अट नसते. तर आपण सर्टफिकेट काँर्सेस करुन किंवा एमसीजे म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँण्ड जर्नालिझम या दोन वर्षाच्या कोर्स नंतर पत्रकारीतेत येउ शकतो. या क्षेत्रात साध्या वार्ताहारापासून ते थेट संपादक या पदापर्यंत जाण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या मध्ये आपण आपली आवड जोपसू शकतो. उदा. ज्यांना साहित्य वाचनाची-लिखाणाची आवड आहे ते प्रामुख्याने या प्रकारच्या बातम्या लिखाण इ. साठी काम करु शकतात. तसेच खेळ, व टुरिस्ट जर्नालिझम हा देखील चांगला पर्याय आहे.
   दुसरा पर्याय म्हणजे जन संपर्क अधिकारी आपण एखाद्या प्रख्यात माणसासाठी(सेलिब्रिटी) कंपनी साठी किंवा शासनासाठी देखील काम करु शकतो. यात सेलिब्रिटी किंवा कंपनीच्या नव्या धोरणांची जाहीरात करणे, पत्रकार परीषद घेउन ती लोकांपर्यंत पोहचवणे, तसेच त्यासंदर्भात लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे. त्यांच्या करता पत्रकार परिषद आयोजीत करणं. त्यात आपण काम करत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेची बाजू माध्यमांसमोर मांडणं अशी महत्वाची कामं जन संपर्क अधिकारी करतो.
   एखाद्या कंपनीचा जन संपर्क अधीकारी हा गव्हर्नमेंट लायसनींग, म्हणजे शासकीय परवाना, कंपनीला मिळवून देण्यासाठी काम करतो. तसेच काँर्पोरेट पीआर आणि काँर्पोरेट सोशल रीलेशन इ . कामे बघतो.हे क्षेत्र देखील नव्याने उदयाला येत आहे . यात ही भरमसाठ पैसा आहे.
                              
                              E:  फॉरENTERTAINMENT
एंटरटेंमेंट या क्षेत्राचे मुख्यत: दोन भाग आहेत. एक म्हणजे एंटरटेंमेंट आणि दुसरा म्हणजे इंफोटेंमेंट. एंटरटेंमेंट सध्या काळाची गरज झाली आहे. प्रत्येक घराघरांत प्राइम टाईम मध्ये म्हणजे संध्याकाळी टिव्ही चा वापर फक्तं आणि फक्त मनोरंजना साठीच होतो. या क्षेत्रामध्ये मालीकेतील पात्रांपासून ते अगदी बँकस्टेज आर्टिस्ट म्हणजे कँमेरा मँन, लाईट मन, स्टमँन, व्हिडियो एडिटर. अँनीमेशन आर्टीस्ट, डबिंग आर्टिस्ट, संवाद लेखक, गीत कार, म्युझीशीअन, असिस्टंट डायरेक्टर अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. आपली आवड ओळखून आपण यात करीअर करु शकतो. या क्षेत्रातील संधी पाहता. आपण नाटक, सिनेमा, गाण्यांचे अल्बम, लाईव्ह शो, मालीका इ. मध्ये बरीच मागणी आहे.
याचाच दुसरा भाग म्हणजे इंफोटेंमेंट :  या क्षेत्रासाठी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. इंफोटेंमेंट म्हणजे इंनफॉरमेशन विथ इंटरटेंमेंट. इथे काम करताना आपल्याला माहिती मनोरंजकपणे मांडता आली पाहिजे. मुख्यत: इथे डॉक्युमेंट्री फिल्म बनवणा-यांना जास्तं वाव असतो. इथे ही करीअरच्या संधी फार आहेत. उदा. डिस्कव्हरी चँनल, नँशनल जिओग्राफी, हिस्टरी, टिएलसी, एचपी ट्रँव्हल इ. चँनल आणि त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये येण्याचं प्रमाण सध्या वाढिस लागलं आहे. इथे नँरेटर, ट्रांसलेटर, टुर जर्नालिस्ट, स्क्रिन प्ले रायटर, रिसर्चर म्हणजे नेहमी पेक्षा काहीतरी वेगळा विचार करणारे. इत्यादी लोक चांगले करीअर करु शकतात.
  या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपण नँशनल स्कुल ऑफ ड्रामा, दिल्ली, पुणे आणि मुंबई विद्यापिठात प्रवेश घेउ शकता. तसेच बँकस्टेज आर्टिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी अँनिमेशन शिकवणा-या संस्थांचा आपण विचार करु शकता.या आहेत आपल्या आईस करिअर मधील संधी आणि त्यातील क्रिम पोस्ट. तर मग याग्य वेळी विचार करुन निर्णय घ्या. धन्यवाद.
                                                
                                                                
 रत्नाकर पवार
9820501363                                                                                                                                                                                                                       spratnakar@gmail.com